August 9, 2025

डॉ.बाबासाहेबांना जेवण बनवून देणाऱ्या काशीबाईचे दुःखद निधन

  • पुणे (अशोक आदमाने ) – विश्वरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःच्या हाताने जेवण बनवून देणाऱ्या काशीबाई दत्तात्रय गायकवाड यांचे १४ एप्रिल २०२४ रोजी भीम जयंती दिवशी पहाटे ३ वाजता वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
    जेव्हा जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर तळेगावला यायचे तेव्हा काशीबाई स्वयंपाक बनवायच्या व डॉ.बाबासाहेबांच्या बंगल्याचे सर्व काम देखील करायच्या.धामने गावातील डॉ.बाबासाहेबांचे कार्यकर्ते दत्तात्रय गायकवाड हे काशीबाईंचे पती असून ते डॉ.बाबासाहेबांना सामाजिक कार्यात सहकार्य करत होते.
error: Content is protected !!