August 8, 2025

ज्ञान महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरूजींना ज्ञानोद्योग विद्यालयात अभिवादन

  • येरमाळ – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,दि.७ ऑगस्ट २०२५ वार गुरुवार रोजी ज्ञानोद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरूजींच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डी.बी.मोरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सहाय्यक शिक्षक डॉ. अमर बारकुल,सयाजी बारकुल, विनोद बारकुल,गट्टूवार सर,लाटे एच.के.,दत्ता जेवे आदी मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!