धाराशिव (जिमाका) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 40 – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दि.15 एप्रिल 2024 रोजी तीन व्यक्तींनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. आर्यनराजे किसनराव शिंदे यांनी राष्ट्रीय समाज दल (आर),नवनाथ विश्वनाथ दुधाळ यांनी (विश्व शक्ती पार्टी ) आणि अर्जुन सिद्राम सलगर यांनी (अपक्ष) म्हणून नामनिर्देशितपत्र दाखल केले. आज 23 व्यक्तींनी 59 अर्जाची उचल केली.दोन दिवसात 41 व्यक्तींनी 95 अर्जाची उचल केली तर 3 व्यक्तींनी उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला