August 8, 2025

जय भवानी विद्यालय,पारा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • पारा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे सचिव व शिक्षणतज्ञ डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक एन.बी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी विद्यालय,पारा येथे दि.७ ऑगस्ट २०२५ वार गुरुवार रोजी संस्थापक अध्यक्ष,शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    या कार्यक्रमास सहाय्यक शिक्षक संदिप भराटे,सौ.शितल मेटे, सतीश वाघमारे,दीपक मुरकुटे, विकास माळी,अमोल बांगर, दीपक मुळे,शहाजी सोलंकर, अमोल गवळी,तुषार डंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
    या अभिवादन सोहळ्याद्वारे गुरुजींचे समाजासाठीचे कार्य, शिक्षणातील निष्ठा आणि दूरदृष्टीची आठवण ताजी करण्यात आली.उपस्थितांनी गुरुजींच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
error: Content is protected !!