August 8, 2025

संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट

  • कळंब – विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर शाळेला ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा कर्तव्यदक्ष संचालिका प्रा.सौ.अंजली ताई मोहेकर यांनी सदिच्छा भेट दिली.
    याप्रसंगी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
    संचालिका प्रा.अंजली मोहेकर यांनी शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. शाळेच्या प्रगतीसाठी उपयुक्त अशा काही सूचनाही त्यांनी दिल्या. शाळेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी शिक्षकवर्गाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
    या प्रसंगी मुख्याध्यापक सुभाष लाटे,सहशिक्षिका रोहिणी मोहेकर, श्रीमती कावळे एल.आर., कल्याणकर जी.बी.,बारकुल एम.डी.,मिटकरी ए.बी.,श्रीमती लाखे एस.व्ही.,तांबारे व्हि.के.,मोरे व्हि.एन.,वाघमारे बी.टी.,श्रीमती गव्हाणे एस.बी.,बन डी.एस., श्रीमती सगरे एस.बी., श्रीमती वाघमारे एस.एम.,श्रीमती टवटेवाड एस.व्ही.,श्रीमती सुतार एस.एम., जगताप एम.टी.,मुंडे के.यु., वळेकर डी.ए.आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!