कळंब – विश्वरत्न कायदेपंडित महामानव डॉ.बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३३ व्या जन्मोत्सवानिमित्त दि.१४ एप्रिल २०२४ रोजी शहरातील छत्रपती संभाजी राजे नगरातील धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्राचार्य सूरज भांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,प्रा.मोहिनी शिंदे,आदित्य गायकवाड,विनोद कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी