August 8, 2025

शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसारच्या वतीने अभिवादन

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली,ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे दि.७ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    या अभिवादन सोहळ्यास विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे,पर्यवेक्षक सतीश कानगुडे,सहशिक्षक डी.बी. मडके,उच्च माध्यमिक विभागाचे प्रा.सुनील साबळे,कमलाकर शेवाळे तसेच कळंब येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे कर्मचारी विठ्ठल फावडे यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • तसेच,ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय,मोहा येथेही शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सहशिक्षक कमलाकर शेवाळे,चिलवंत राजाभाऊ,सौ. उषा पांचाळ,धनंजय परजणे, जाधव विष्णूदास आदींची उपस्थिती होती.
    या कार्यक्रमातून संस्थेच्या संस्थापकांविषयी आदर,प्रेरणा व कृतज्ञतेची भावना पुन्हा एकदा उजळून निघाली.
error: Content is protected !!