August 8, 2025

विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल, आष्टा (ता.भूम) येथे दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुवारी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
  • या कार्यक्रमास सहशिक्षक नामदेव अंनत्रे, शशिकांत मांजरे, संघपाल सोनकांबळे, सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करताना शिक्षण महर्षींच्या कार्याचा आदर्श घेऊन शिक्षण क्षेत्रात नवनवीन वाटचाल करण्याचा संकल्प व्यक्त केला.
error: Content is protected !!