लातूर (दिलीप आदमाने) – नुकत्याच झालेल्या लोकसेवा परीक्षेत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील एम.ए. समाजशास्त्र विषयातील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील माजी विद्यार्थी नवनियुक्त सीपीएफ असिस्टंट कमांडन्ट व्यंकट प्रकाश गायकवाड यांचा सत्कार श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील (टाकळीकर) यांच्या हस्ते पुष्प गुच्छ, शाल आणि देशीकेंद्र महाराजांचा ग्रंथ देऊन करण्यात आला, यावेळी संस्थेचे सहसचिव सुनीलजी मिटकरी, प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई, उपसरपंच गोरख सावंत,डॉ. सिद्राम डोंगरगे,डॉ.मंतोष स्वामी, डॉ. सुजित हंडीबाग,डॉ.दीपक पाटे,कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यंकट प्रकाश गायकवाड यांनी निलंगा तालुक्यातील शेंद या ग्रामीण भागातून प्राथमिक शिक्षण घेतले असून महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात एम.ए.समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी आपल्या साधारण परीस्थितीतून आणि कठोर परिश्रमातून लोकसेवा परीक्षेमध्ये उत्तुंग यश प्राप्त केल्याबद्दल श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, उपाध्यक्ष माधवराव पाटील (तपसेचिंचोलीकर), कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीप दिंडीगावे, संचालक राजेश्वर बुके, संचालक बस्वराज (राजू) येरटे, संचालक काशिनाथ साखरे, संचालिका ललिता पांढरे, संचालक राजेश्वर पाटील, संचालक बाबुराव तरगुडे, संचालक प्रभूप्पा पटणे, संचालक गुरुलिंग धाराशिवे आणि संचालक महेश हालगे यांनीही अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सेंद ग्रामस्थांनी गावामध्ये भव्य मिरवणूक काढून त्यांचे जंगी स्वागत करून गुणगौरव सोहळा सुद्धा थाटात संपन्न केला आहे. संपूर्ण निलंगा तालुक्यामध्ये त्यांचे कौतुक होत आहे.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे