लातूर – येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सन २०१३ पासून १०७ सुरक्षा रक्षक केवळ नऊ हजार रुपये मासिक वेतनावर प्रामाणिकपणे सेवा बजावत होते. कोरोना काळात रुग्णांच्या नातेवाईकांनी जवळ येण्यास नकार दिला असताना,हेच सुरक्षा रक्षक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेत तत्पर होते. त्यांनी वेळप्रसंगी मृतदेह उचलणे व अंतिम संस्कार करणेही नित्याचेच मानले होते. मात्र,दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी रुग्णालयाचे अधीक्षक यांनी या १०७ सुरक्षा कर्मचाऱ्यांना “उद्यापासून कामावर येऊ नये” असा आदेश देणारे पत्र दिले. त्यामुळे हे कर्मचारी अचानक बेरोजगार झाले असून त्यांच्या समोर उपासमारीची वेळ उभी ठाकली आहे. या अन्यायाविरुद्ध भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर,भीम आर्मीचे माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी रुग्णालय अधीक्षकांना निवेदन सादर करत,या १०७ सुरक्षा कर्मचाऱ्यांना तात्काळ पुन्हा कामावर घेण्याची मागणी केली आहे.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती उदगीरच्या वतीने शालेय चित्रकला स्पर्धा संपन्न