August 8, 2025

जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!

  • युवा भीम सेनेच्या पुढाकाराने शासनाचे लक्ष वेधले
  • लातूर (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – जिल्हा परिषद लातूर येथील महिला परिचर व त्यांच्या समर्थनार्थ युवा भीम सेनेच्या वतीने ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. वर्षानुवर्षे न्यायासाठी लढणाऱ्या महिला परिचरांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.
    सदर महिला परिचरांना फक्त ३,००० रुपये मानधन देऊन पूर्णवेळ काम करणे भाग पाडले जात आहे. त्यामुळे त्यांना नियमित कर्मचाऱ्यांचा दर्जा देत,कायम वेतनावर नेमणूक करावी,अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.याशिवाय, भाऊबीजसारख्या सणांचे अनुदान,गणवेशाचा अभाव आणि किमान २१,०००/- रुपये मासिक वेतन यांसारख्या विविध मागण्या आंदोलकांनी मांडल्या.
    या ठिय्या आंदोलनात युवा भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष पंकज भाऊ काटे,प्रवक्ते सुफी सय्यद शमशोद्दीन,महेबुबभाई सय्यद, महिला जिल्हाध्यक्षा उमाताई आदमाने,युवा जिल्हाध्यक्ष शेखर कांबळे,निलेश मस्के,गणेश पोटभरे,रोहन रायभोळे,महेंद्र मोरे, शिरीष मांदळे,तसेच संघाच्या जिल्हाध्यक्षा संगीता गवळी, सुवर्णा कळसे,सविता कांबळे, नम्रता गरड,संगीता घोलप,वंदना फुले,साजिदा पठाण,अयोध्या चोले,सुरेखा केसाळे,शिवकांता गायकवाड,अर्चना कांबळे,मंदोदरी हांडे,भाग्यश्री विरकर व इतर अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शेकडो महिला परिचर सहभागी झाल्या होत्या.
    आंदोलनादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलकांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले असून सर्व मागण्या शासन दरबारी जबाबदारीने मांडल्या जातील, असे आश्वासन दिले.
    या आंदोलनामुळे महिला परिचरांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले असून,लवकरच योग्य निर्णय अपेक्षित असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
error: Content is protected !!