August 8, 2025

ज्ञान प्रसार विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या ९७ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील होते.
    याप्रसंगी दीपप्रज्वलन करून ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन तात्यासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर, मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप तसेच उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.प्राचार्य संजय जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गुरुजींच्या शैक्षणिक कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी ज्युनियर आय ए एस या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेली सातवीतील विद्यार्थिनी लोकरे प्रगती या विद्यार्थिनीला प्रमाणपत्र व ट्रॉफी तसेच सहशिक्षक कमलाकर शेवाळे यांनी रोख रक्कम बक्षीस म्हणून देऊन तिचा सत्कार केला. तसेच या परीक्षेतील 14 यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक सतीश मडके यांनी केले तर आभार प्रा. नवनाथ करंजकर यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!