August 8, 2025

संभाजी विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांची जयंती उत्साहात साजरी

  • पिंपळगाव – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथील संभाजी विद्यालय ज्ञानप्रसारक मंडळाचे संस्थापक शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांची ९७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
    यावेळी सुरवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक वाय.बी.सावंत यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर या प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी यामध्ये कु.ऋतुजा भालेकर, निकिता गाडे,इश्वरी पटाडे तसेच इ. 8 वी मधील कु. वेदिका जोंधळे,कु.आश्विनी गाडे व शंभूराजे पटाडे यांनी मोहेकर गुरुजींच्या कार्याविषयी व त्यांच्या महती विषयी सुंदर शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
    यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक युवराज सावंत यांनी गुरुजींच्या शिक्षण कार्या विषयी माहिती दिली.व उपास्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
    या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रशालेचे सहशिक्षक जगताप एस. पी.यांनी केले तर प्रास्ताविक दिपक जोंधळे यांनी केले. यावेळी शाळेचे स.शि.बावकर एस.एम, ढोले एस.के. तसेच बोडके एस. एम,शिक्षकेत्तर शिंदे एस.जे. व फुरडे आर.एल हे उपस्थित होते.
    शेवटी बोडके एस.एम. यांनी सर्वांचे आभार मानले व या कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!