धाराशिव (जिमाका) – एकात्मिक बालविकास सेवा योजना, ग्राम प्रकल्प वाशी अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.अर्ज स्वीकृतीची मुदत ४ मार्च २०२५ असून,प्रकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जातील.संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.अधिक माहितीसाठी प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा. या भरतीमध्ये ४ अंगणवाडी सेविका आणि २५ अंगणवाडी मदतनीस यांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये पारगाव (पाथरड वस्ती), पारगाव (आनंद नगर),जानकापूर (पवार वस्ती),पिंपळगाव क (पारधी वस्ती), तांदुळवाडी (साखर कारखाना),मांडवा (पारधी वस्ती), इंदापूर (साखर कारखाना), सोनारवाडी (नांदूरकी वस्ती), सरमकुंडी (फाटा) फक्राबाद (मुरकुटे बिक्कड वस्ती),पिंपळगाव लिंगी (झोपडपट्टी वस्ती),पिंपळगाव (को), पिंपळगाव (को) तांबडे वस्ती तेरखेडा पारधी वस्ती नं.०१,तेरखेडा,घोडकी, घाटपिंपरी,म्हसोबाचीवाडी, दसमेगाव (पारधी वस्ती) याठिकाणी अंगणवाडी मदतनीस यांची प्रत्येकी १ पदासाठी तर गोजवडा (३ पदे अंगणवाडी मदतनीस),पारा (३ पदे अंगणवाडी मदतनीस) भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दसमेगाव,गोलेगाव,शेलगाव,पांगरी येथे पदे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रत्येकी १ पद भरण्यात येणार आहेत.
More Stories
शिवशक्ती सहकारी साखर कारखानाच्या वतीने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा सत्कार
हनुमंत पाटुळे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित
संभाजी विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा