June 19, 2025

शिवशक्ती सहकारी साखर कारखानाच्या वतीने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा सत्कार

  • वाशी – शिवशक्ती सहकारी साखर कारखाना,वाशीच्यावतीने नुकताच महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात कारखान्याचे व्हा.चेअरमन भागवतराव धस,संचालक भास्करराव शिंदे,दिलीपराव लोमटे,पांडुरंग भराटे,नितीन चेङे आदी मान्यवर उपस्थित होते.
    सत्कार समारंभातसहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सहकार क्षेत्रातील वर्तमान घडामोडींवर प्रकाश टाकत कारखान्याच्या प्रगतीला शुभेच्छा दिल्या.यावेळी कारखान्याच्या आगामी योजना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या नव्या योजना व सहकारमंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
    कार्यक्रमाचे संयोजन उत्कृष्टपणे पार पाडण्यात आले असून, कारखान्याच्या वतीने सहकारमंत्र्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
error: Content is protected !!