June 19, 2025

हनुमंत पाटुळे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित

  • कळंब – वाशी तालुका येथे न्युज लाईव्ह एम.एच.२५ व्हि.के.या वृत्त वाहिनीचा पहिला वर्धापन दिन गुरुवार दि.१९ सप्टेंबर २०२४ रोजी इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला.या वेळी गेल्या २० वर्षापासुन पत्रकारीता क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील रहिवासी असणारे हनुमंत भाऊ पाटुळे यांना “उत्कृष्ट पत्रकार” म्हणुन सन्मानित करण्यात आले.
    त्यांनी या पुर्वी विविध वर्तमानपत्राचे प्रतिनिधी म्हणुन कार्य केले असुन सध्या ते दै.विकास धारा या वृत्तपत्राचे (कळंब व वाशी) तालुका प्रतिनिधी म्हणुन कार्यरत आहेत. या वेळी वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घुले यांच्या हस्ते “सन्मान पत्र” व “ट्राॅफी” देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
    या वेळी न्यूज लाईव्ह एम एच २५ व्हि.के. वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक विशाल काळे (बी.जे.एन.टि.व्ही) धारशिव ब्युरो चीफ यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून
    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.सरला ताई खोसे,वाशी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक घुले, युवा सेना जिल्हा प्रमुख उमेश जाधव हे होते. तर प्रमुख उपस्थीती म्हणून प्राचार्य डॉ.आरुण गंभीरे, जनहित पतसंस्थेचे संतोष तौर,ॲड.राजेंद्र कांबळे, ॲड.महेद्र कासार,एस.बी.आय. शाखेचे शाखा व्यवस्थापक शरद वाठोरे,शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष दादासाहेब चेडे, दै.पुढारीचे पत्रकार दादासाहेब लगाडे,साहित्यिक श्रावण भाऊ क्षिरसागर, जाणिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे,जाफरभाई शेख हे होते. या वेळी मान्यवरांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर कायदेविषयक मार्गदर्शन व्यक्त केले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता विद्यामंदिर युनिव्हर्सिटीचे शिवाजी एल वरती यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.कर्मवीर जगदाळे मामा महाविद्यालय वाशीचे बालाजी पाटील, लातुर जिल्हा प्रतिनिधी अनिल टेळे, नवनियुक्त प्रतिनिधी पवन नाडे, झुंजार वार्ताचे प्रतिनिधी दत्ता गोरे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक विशाल काळे यांनी आभार मानले.
error: Content is protected !!