February 8, 2026

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना भावपूर्ण अभिवादन

  • ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय, मोहा येथे प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न
    मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि मुख्याध्यापक अविनाश मोरे व प्रशालेचे पर्यवेक्षक सतिश कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.५ फेब्रुवारी २०२५ (गुरुवार) रोजी ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय,मोहा येथे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला.यावेळी त्यांच्या शिक्षणप्रेमी विचारांची उजळणी करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये संस्कार,शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
    या प्रसंगी सहशिक्षक कमलाकर शेवाळे,चिलवंत राजाभाऊ,सौ.उषा पांचाळ,ज्ञानोबा टोपे,धनंजय परजने तसेच प्रशालेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरुजींविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प केला.
    कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
error: Content is protected !!