कळंब – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या मार्ग तपासणी अधिकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभारामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.बस तपासणीच्या नावाखाली गाड्या दीर्घकाळ एकाच ठिकाणी उभ्या केल्या जात असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार,बस चालू असताना तपासणी करणे शक्य असतानाही गाडी थांबवून दीर्घकाळ तपासणी केली जाते. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो व नियोजित कामांमध्ये उशीर होतो. ज्येष्ठ नागरिक,महिला,विद्यार्थी तसेच कामगार वर्गाला याचा विशेष त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जाते. दिव्यांग प्रवाशांच्या कागदपत्रांची पडताळणी करतानाही अधिक वेळ घेतला जात असल्याची चर्चा आहे.या तपासण्यांमुळे वाहकांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर येत आहे.बस थांबवून नव्हे तर चालत्या बसमध्येच तपासणी करावी,अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. सर्वत्र कडक तपासणी सुरू झाल्याने काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.प्रवाशांचा वेळ व सोयीचा विचार करून तपासणी प्रक्रियेत सुसूत्रता आणावी व अनावश्यक विलंब टाळावा,अशी मागणी करण्यात येत आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन आवश्यक ती पावले उचलावीत,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी