कळंब ( माधवसिंग राजपूत ) – एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या व इतर मागणीसाठी कळंब बस आगारातील वाहक म्हणून सेवेत असलेले सचिनानंद पुरी यांनी दि.२७ जून २०२४ रोजी कळंब येथील बीएसएनएल कार्यालयाच्या प्रांगणातील मोबाईल टॉवरवर सकाळी ९.३० दरम्यान चढून आंदोलन सुरू केले. अचानक पणे सुरू झालेल्या या आंदोलनामुळे महसूल प्रशासन,पोलीस,एसटी महामंडळ अधिकारी यांची धावपळ झाली व पुरी याने टॉवर वरून उतरावे यासाठी प्रयत्न सुरू केले. खबरदारीची उपायोजना म्हणून आंदोलनाच्या स्थळी तात्काळ अग्निशामकदल गाडी, रुग्णवाहिका यांना पाचारण करण्यात आले. यानंतर नायब तहसीलदार राजू तापडिया, सहाय्य पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे ,एस टी महामंडळ उस्मानाबाद विभागीय कार्यालयाचे कामगार अधिकारी प्रमोद सुतार,कार्यालयीन अधिकारी श्रीधर नेहरकर,कळंब बसआगार प्रमुख मिथुन राठोड बीएसएनएल अधिकारी ठाकूर सचिनानंद पुरी यांचे वडील ह.भ.प. अशोक महाराज पुरी, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ,सचिनानंद पुरी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यानी टॉवर वरून खाली उतरावे यासाठी विनंती केली तसेच कळंब व बसआगार प्रमुख यांनी मिथुन राठोड यांनी मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क करून या संबंधी माहिती दिली तसेच अधिकारी पातळीवरून व पुरी यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न अधिकारी पातळीवर सुरू असल्याचे सांगितले.मुंबई येथे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्र्यांचा संपर्क होऊ शकला नाही. एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यावर राज्य सरकारकडून वेळोवेळी अन्याय केला जात आहे. कामगार संघटना कामगारांचे प्रश्न सोडविण्यात असमर्थ ठरत असून यासाठी कर्मचाऱ्यांनी संघटने शिवाय आंदोलन करावे अशी पुरींची भूमिका आहे.यापूर्वी गळफास आडकावुन झाडावर चढून तसेच गत दोन वर्षांपूर्वी याच बीएसएनएल टॉवर चढून पुरी यांनी आंदोलन केले होते.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश