August 8, 2025

राज्याचे पावसाळी अधिवेशनाच्या निवडक महत्वाच्या घडामोडी

  • विधानपरिषदेच्या दिवंगत सदस्यांना शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली
    मुंबई (विसअं) –
    विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषद सभागृहाच्या दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव सादर केला.
    दिवंगत माजी राज्यमंत्री गंगाधर सुखदेवराव गाडे, सदस्य मधुकर यशवंत देवळेकर, मधुकर शामराव वासनिक, वसंत पुरुषोत्तम मालधुरे, बळवंतराव गणपतराव ढोबळे या दिवंगत सदस्यांना यावेळी उपस्थित सदस्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
  • @ वंदे मातरम् व राज्यगीताने विधान परिषदेच्या कामकाजास सुरुवात
    मुंबई – राज्य विधिमंडळाच्या सन २०२४ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास विधानपरिषदेत ‘वंदे मातरम्‌’ आणि राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ने सुरुवात झाली.
    विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मंत्री आणि विधानपरिषदेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
  • विधानपरिषदेत सभापती तालिका नामनिर्देशित
  • मुंबई – विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभापती तालिकेवरील सदस्यांची नावे जाहीर केली.
    विधानपरिषद सदस्य सर्वश्री प्रसाद लाड, विलास पोतनीस, अमोल मिटकरी, अभिजीत वंजारी, डॉ. मनीषा कायंदे यांना सभापती तालिकेवर नामनिर्देशित केल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी जाहीर केले.
  • विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती
    मुंबई -विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची आज घोषणा केली. विधानसभा सदस्य संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर, अमिन पटेल, डॉ.किरण लहामटे, समाधान आवताडे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
error: Content is protected !!