August 8, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.16 जुन रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 428 कारवाया करुन 3,60,950 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • मा.पोलीस अधीक्षक श्रीमती. रितु खोखर, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली काल सोमवार दि.16.06.2025 रोजी अवैध मद्य विरोधी धाराशिव जिल्हयात पोलीस ठाणे हद्दीत 08 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेले 49 लिटर गावठी दारु,40लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव व व देशी विदेशी दारुच्या 163 सिलबंद बाटल्याअसे मद्य जप्त करण्यात आले. सदर जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 43,815 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 08 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
  • 1)शिराढोण पो ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-सचिन उर्फ शत्रुघ्न बिभिषन नागरगोजे, वय 35 वर्षे, रा. खामसवाडी ता.कळंब जि. धाराशिव हे 15.45 वा. सु.अंबिका हॉटेलच्या पत्र्याचे शेडचे पाठीमागील बाजूस अंदाजे 7,430 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 98 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-कालीदास मगन शेळके,वय 33 वर्षे, रा. खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव हे 16.50 वा. सु.हॉटेल सातबाराचे पाठीमागे अंदाजे 1,510 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 20 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-साहिल सत्तार शेख,रा. खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव हे 18.00 वा. सु.अमर वडापाव सेंटर समोर खामसवाडी येथे अंदाजे 26,255 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 18 सिलबंद बाटल्या स्कुटी सह अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • 2)धाराशिव ग्रामीण ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-साखरबाई राजेंद्र पवार,वय 55 वर्षे, रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव या 13.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,440₹ किंमतीची 14 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 3)नळदुर्ग ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-रामचंद्र राजेंद्र जोगदंड,रा.सतनाम चौक सोलापूर, ह.मु. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 16.45 वा. सु. एमएसईबी येथे रंभाजी धाब्याजवळ अंदाजे 1,100₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • 4)लोहारा ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-संजय भिमा कांबळे, वय 52 वर्षे, रा. होळी ता. लोहारा जि. धाराशिव हे 16.45 वा. सु. समाज मंदीराचे बाजूला होळी येथे अंदाजे 1,280₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 16 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • 5)कळंब ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-राजा बाजीराव काळे, वय 60 वर्षे, रा.तांदुळवाडी ह.मु. बसस्थानक कळंबचे समोर ता. कळंब जि. धाराशिव हे 17.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 2,800₹ किंमतीची 35 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 6)तुळजापूर ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-राजकुमार कलाप्पा तेलगाकर, वय 45 वर्षे, रा.बेंबळी ह.मु. कमानवेस तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 18.30 वा. सु. अष्टपुजा गॅरेजच्या पाठीमागे लातुर रोड तुळजापूर येथे अंदाजे 2,000₹ किंमतीची 40 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.16.06.2025 रोजी 16.00 वा. सु. नळदुर्ग पो ठाणे हद्दीत विजय किराणा दुकानाचे बाजूला पत्राचे शेडसमोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- बालाजी प्रकाश गंगणे, वय 34 वर्षे, रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 16.00 वा. सु. विजय किराणा दुकानाचे बाजूला पत्राचे शेडसमोर कल्याण मटका जुगाराचे साहित्य एकुण 2,670 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले नळदुर्ग पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • बेंबळी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- नानासाहेब चंद्रसेन लोखंडे, वय 36 वर्षे, रा. मेसाई जवळगा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 15,000₹ किंमतीची हिरो मोटरसायकल क्र एमएच 25 झेड 3231 ही दि.08.06.2025 रोजी 14.00 ते 15.00 वा. सु. पाटोदा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नानासाहेब लोखंडे यांनी दि.16.06.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-व्यंकट अंजनया स्वामी, वय 54 वर्षे, रा. तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.29.05.2025 रोजी 16.00 ते 17.00 वा. सु. तुरोरी येथील ईश्वर मेडीकल स्टोअर उघडे ठेवून डब्बा आणण्यासाठी घरी गेले असता अज्ञात व्यक्तीने त्याचा फायदा घेवून व्यंकट स्वामी यांचे मेडीकलचे गल्यातील 1,25,000₹ चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- व्यंकट स्वामी यांनी दि.16.06.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • आंबी पोलीस ठाणे :आरोपी नामे-सोमनाथ जालींदर गायकवाड,शोभा सोमनाथ गायकवाड, सचिन सोमनाथ गायकवाड सुरज सोमनाथ गायकवाड,रा. चिंचपुर बु. ता. परंडा जि. धाराशिव इतर एक इसम यांनी दि.09.06.2025 रोजी 14.00 वा. सु.चिंचपुर येथे फिर्यादी नामे- धनंजय कल्याण गायकवाड, वय 40 वर्षे, रा. चिंचपुर बु., ता. परंडा जि. धाराशिव यांना व त्यांचे वडील कल्याण काशीनाथ गायकवाड यांना नमुद आरोपींनी घराचे बाहेर बोलावून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयता, दगड व काठीने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-धनंजय गायकवाड यांनी दि.16.06.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118 ,118(1), 115(2), 352, 351(2) (3), 191(1), 191(2),190 सह आर्म ॲक्ट कलम 4/25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “फसवणुक.”
  • ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-प्रशांत वसंत वराळे, प्रविण वसंत वराळे, दोघे रा. मुळेवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.01.01.2014 ते दि. 29.04.2024 पावेतो मुळेवाडी येथे फिर्यादी नामे- उत्रेश्वर प्रभु वराळे, वय 41 वर्षे, रा. मुळेवाडी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी जमीनीचा वाद कोर्टात चालू असुन फिर्यादी व आरोपी यांनी सन2014 ते 2016 पावेतो मुळेवाडी येथे खाजगीरित्या दरमाहा 1000 ₹ प्रमाणे 50 सदस्याची बीसी चालवित होते. नमुद आरोपींनी संगणमत करुन शेतीचा वाद चाजू असल्याने बीसीच्या व्यवहारापोटी फिर्यादी यांचे कडून तारण म्हणून चेक घेवून त्यावर त्यांचे सोईनुसार नाव रक्कम व तारीख नमुद करुन धनादेशाचा गैरवापर केला.व स्वत:ला गैरलाभ मिळविण्यासाठी फिर्यादीच फसवणुक केली. वगैरे कागदपत्र मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय कोर्ट 3 रे धाराशिव यांचे कडुन प्राप्त झाल्याने दि.16.06.2025रोजी ढोकी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं.कलम 420,467, 468, 471, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “लैंगीक अत्याचार.”
  • कळंब पोलीस ठाणे :एका गावातील 24 वर्षीय मुलगी (नाव- गावगोपनीय) सन2017 ते ऑक्टोंबर 2024 रोजी गावातील एका तरुणाने त्याचे घरी नमुद मुलगी ही अल्पवयीन आहे ही माहित असताना नमुद तरुणाने तिस आय पीलच्या गोळ्या खावू घालून वांरवांर तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. त्यातील दुसऱ्या महिला आरोपीने पिडीतेचे न ऐकता अपप्रेरणा देवून नमुद तरुणास म्हाणाली की, तुम्हाला वाढदिवसाला एका रात्रीसाठी गिफ्ट देते असे म्हणाली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.16.06.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(2),(एफ) (आय) (एम), 69, 55 पोक्सो कलम 4, 6, 16 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : मयत नामे-लक्ष्मण मारुती जाधव, वय 28 वर्षे, रा. बावी ता. जि.धाराशिव यांनी दि.16.06.2014 रोजी 10.00 वा. पुर्वी बावी येथे मयत पत्नी नामे-तेजस्वीनी लक्ष्मण जाधव, वय 23 वर्षे, व मयत मुलगा नामे- शिवांश लक्ष्मण जाधव, वय 2 वर्षे, दोघे रा.बावी ता. जि. धाराशिव यातील मयत नामे लक्ष्मण जाधव यास ऑनलाईन रमी खेळण्याचे व्यसन जडल्याने त्यातुनच त्याने त्याचे हिश्याची जमीन व प्लाट विकुन टाकले होते. आर्थिक क्विंचनेतुन आलेल्या नैराश्यातुन नमुद मयत यांनी सामुहिक रित्या विषारी औषध पिवून व स्वत: गळफास घेवून आत्महत्या केली. वगैरे मजकुरावरुन दि.16.06.2025रोजी धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 194 अन्वये प्रथमदर्शनी आक्समात मृत्यु दाखल असुन सदर आक्समात मृत्यु चा तापास चालु आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!