यवतमाळ [संजय कांबळे यांज कडून]– भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत)’ च्या वतीने भगवान गौतम बुद्धांचा वैशाखी पौर्णिमा उत्सव २०२४’ आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 150 वी जयंती व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ‘भारतीय सामाजिक समानता’ या विषयावर सातवी राष्ट्रीय परिषद 26 जुन 2024 ला दिल्ली येथे झालेल्या, या परिषदेत भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) महाराष्ट्र स्टेट को-ऑर्डिनेटर तसेच सक्षम बहुउद्देशीय संस्था च्या अध्यक्ष कर्मा तेलंग यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नॅशनल अवार्ड 2024 ने सन्मानित करण्यात आले यावेळी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.पठाण, भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.संजय कांबळे, खासदार धैर्यशिल मोहिते पाटील,खा. भाऊ वाकचौरे ,सुश्री रिनचेन ल्हामो, अल्पसंख्याक सदस्य भारत सरकार किशोर मखवाना अध्यक्ष एससी आयोग भारत सरकार तसेच अधिकारी व पदाधिकारी आणि भारतातील नामांकित मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या यशाचे श्रेय कर्मा तेलंग यांनी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय कांबळे महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि आईला व त्याचे सहकारी मित्रपरिवार यांना दिले या कार्यक्रमाचे नियोजन महासंघाचे केंद्रीय संघटक प्रा. गौरख साठे तर राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त तसेच केंद्रीय मंत्री आठवले यांचं स्विय सहाय्यक मनिष गवळी यांनी यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी श्रम घेतले.
More Stories
यवतमाळ येथे वृक्षारोपण कार्यक्रम