August 8, 2025

“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!

  • डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त दोन्ही ठिकाणी संपन्न सोहळा
  • मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी शहरातून प्रकाशित होणाऱ्या व निर्भीड मुख्य संपादक सुभाष द.घोडके यांच्या संपादकीय कुशलतेतून साकारत असलेल्या सा.साक्षी पावनज्योत या वृत्तपत्राचे मार्गदर्शक तथा ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी दोन ठिकाणी दिमाखात पार पडले.
    पहिला कार्यक्रम शि.म.ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट,मोहा येथील मुख्य शाखेत चेअरमन हनुमंत (तात्या) मडके यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
    यावेळी प्रसिद्ध व्यापारी अशोक इखे,ऑडिटर माणिक आरकडे, मित्रवर्य अक्षय बचुटे,सुभाष कुचेकर,आणि कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांची उपस्थिती लाभली.

  • दुसरा प्रकाशन सोहळा शि.म.ज्ञानदेव मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज येथे संपन्न झाला.या कार्यक्रमात
    कार्यकारी संचालक डॉ.संतोष मडके व मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मडके यांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन झाले.
    यावेळी शि.म.ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेटचे मुख्य लेखापाल इम्रान शेख,आय टी विभाग प्रमुख प्रमोद मडके,प्रशासकीय अधिकारी श्रीकांत मडके,कर्ज विभाग प्रमुख अतुल मडके,मित्रवर्य अक्षय बचुटे आणि कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!