जगाने अमावस्येला लागलेले सूर्यग्रहण अनेकदा बघीतले आहे. पण अमवस्या नसतानाही खग्रास सूर्यग्रहण? होय २७ में, ला आज* *जवळजवळ ८८ वर्षापूर्वी एकदा लागले आहे. !.* ‘ *मानव मुक्तीचे प्रणेते विश्वरत्न संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अर्थात साहेबांची रमाई ‘रामू’ गेली. अन् दलित, पीडित, शोषित, सर्वहारा समाजाचे जग अंधारात बुडाले . तळपत्या सूर्याच्या सांगातीने या जगाचा अकाली निरोप घेतला आणि अन् हरेक अश्रूंच्या थेंबाचं मोल जाणणा-या साक्षात “क्रांतिसूर्याला” रडू कोसळले…! निरोप घेण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेबांचा हात आपल्या थरथरत्या हातात घेऊन रमाबाई म्हणाल्या, “साहेब”,आपली रमेश* *राजरत्न, इंदू,दगावली. उद्या “यशवंतावर”, जसे लक्ष ठेवाल तसेच लक्ष माझ्या सात कोटी* *लेकरांवर ठेवा…! त्यांची* *काळजी घ्या… त्यांना मान-सन्मान मिळवून द्या…”* *त्यागमूर्ती रमाईचे,रामूचे अंतिम शब्द .. कुवत नसताना ज्या माऊलीने शेवटच्या श्वासापर्यंत केवळ देण्याचेच काम केले.ती आज आपल्याला काहीतरी मागत आहे , हे ऐकून पाषाणालाही पाझर फुटला असता. ते तर “रामूचे” साहेब होते.शोषित पिडितांच्या लेकरांच्या उध्दारासाठी “रामू ” मागते आहे. प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब ओक्साबोक्सी रडले. पण विचलित झाले नाहीत.कारण ‘तेथील’ सूर्याला येथील सूर्याने मनोम:न सांगून ठेवले होते…* *तू तिथला सूर्य..* *तर मी इथला सूर्य आहे.!* *तू ,ता-यांना प्रकाशमान कर* *मी सा-यांना प्रकाशमान* *करतो…!* *आणि डॉ .भीमराव रामजी* *आंबेडकर तथा बाबासाहेब* *दिल्या शब्दाला जागले. रात्रीचा दिवस करून अंधा-या वस्त्यांवर* *दिवे लावले.या खडतर संघर्षात रमाबाईंची,”रामूची”* *डॉ .बाबासाहेबांना समर्थ साथ लाभली नसती तर .* *कल्पनाही करवत नाही.* *गणितीशास्त्रामध्ये ०१+०१= ०२ होतात.*तशी ही साधी* *बेरीज ! पण येथे ०१+०१= ११* *झाले.! यातच सुभेदार* *रामजीबाबा यांच्या लेकराच्या “रमाईचे” माहात्म्य दडले आहे .! आज* *स्मृतिदिनाला आमच्या ४०* *कोटींच्या मायीला,”माता रमाईला” विनम्र अभिवादन करताना आमच्या सारख्यां सेवाभावी कफल्लक फकिरालाही हंबरून येत आहे . तवा अशावेळी कंठ कोणाचा दाटून येणार नाही हो ? पाषाणालाही पाझर फुटतो तसं येणारच !* *बस… आदरणीय साहित्यश्रेष्ठ “यशवंत मनोहर सरांनी”* *साकारलेली “रमाई” अन्* *लंडनमधून डॉ.भीमराव* *आंबेडकर यांनी ३० डिसेंबर* *१९३० ला लिहिलेले पत्र “प्रिय रामू ” किमान आजच्या घडीला पुढारलेल्या नेत्यांनों प्राध्यापक, अभियंते, डॉक्टर, वकील* *भावांनो,ताईंनों, पदवीधर* *लेकरांनों..वाचा.* *”इथे कुणाचेच काही कष्ट नाही* *ही तुझीच कमाई आहे गं रमाई”.!* *ह्याही दोन ओळी कायम* *मन-मस्तिष्कात घेऊन आपण या दांपत्याचे देणे लागतो. नव्हे, त्यांचे न फिटणारे उपकार आपल्यावर आहेत. याची जाणीव ठेवत नम्र वाटचाल करू या…!महामानवाच्या फिक्स डिपॉजिटवर मिळणा-या व्याजातून ८०%सोडा त्यांना* *अपेक्षित २० %हिस्सा दानपारमिता म्हणून* *जनकल्याणासाठी समर्पित करण्यासाठी कटिबद्ध होऊ या.’जयभीम’ या क्रांतिकारी सामाजिक बांधिलकीचा धागा बनवू या..* *तथागत महाकारूणीक गौतम बुद्धाची दानपारमिता दुसरं आणखी काय सांगत नसून हेच ना ! भवतु सब्बं मंगलम्.!* *”रमाई” झाली स्फूर्ती* *ज्योती भीमराव आंबेडकरांची.!* *रमाबाई भीमराव आंबेडकर* *अर्थात चाळीस कोटी लेकरांच्या मातेला कोटी कोटी प्रणाम ! जयभिम ! जय संविधान!! जय भारत!!!*
– समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे
महाराष्ट्र शासन, उपसंपादक सा.साक्षी पावनज्योत,अध्यक्ष रूग्णहक संघर्ष समिती, सोशल मिडिया जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स, ठाणे जिल्हा, विशेष कार्यकारी अधिकारी (SEO) @ ९३२४३६६७०९*
More Stories
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या Burnt Memory तपासणी प्रक्रिया पूर्ण
ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो! मेट्रो लाईन-9 च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला सुरुवात
जिल्हा परिषद ठाणे येथे महाराष्ट्र दिन साजरा