कळंब – कळंब येथील रहिवासी व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बीड येथे व्यवस्थापकीय अधिकारी म्हणुन राहिलेले एजाज मणियार यांची दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी सेवानिवृत्ती झाली आहे. मणियार यांनी इन्शुरन्स कंपनीमध्ये आपली २८ वर्षाची सेवा ३१ ऑक्टोबर १९८६ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत पूर्ण केली आहे व मणियार हे दिनांक २८ मे रोजी हज यात्रेसाठी रवाना होत आहे. त्यानिमित्त त्यांचा वर्गमित्र परिवाराच्या वतीने अभय देवडा, विक्रम गायकवाड ,बाबू पोळ ,अशोक माळी, शरद खंदारे ,माधवसिंग राजपूत यांनी शाल ,बुके देऊन सत्कार केला व त्यांना हज यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले