June 19, 2025

जिल्हा परिषद ठाणे येथे महाराष्ट्र दिन साजरा

  • ठाणे – महाराष्ट्र दिनाच्या ६६ वा वर्धापन दिनानिमित्त वागळे इस्टेट येथील जिल्हा परिषद ठाणे इमारतीच्या आवारात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे रोहन घुगे यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रगीत व राज्यगीत गात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ध्वजवंदन केले.
    यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे,मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) प्रमोद काळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग) प्रकाश सासे,जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललीता दहितुले,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे,उप कार्यकारी अभियंता सुनिल बच्छाव तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. सामान्य प्रशासन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्तमरित्या कार्यक्रमाची तयारी केली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल सुर्यवंशी यांनी केले.
error: Content is protected !!