August 8, 2025

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या Burnt Memory तपासणी प्रक्रिया पूर्ण

  • राजन विचारे व केदार दिघे यांच्या मागणीनुसार कार्यवाही
  • ठाणे – ठाणे जिल्ह्यातील 147-कोपरी पाचपाखाडी व 148-ठाणे विधानसभा मतदारसंघांमधील अर्जदार उमेदवार राजन विचारे आणि केदार दिघे यांच्या मागणीनुसार, संबंधित मतदान केंद्रांवरील EVM-VVPAT मशिन्सच्या Burnt Memory/Microcontroller तपासणीची प्रक्रिया दि. 19 जुलै 2025 रोजी केंद्रीय वखार महामंडळ, तुर्भे, नवी मुंबई येथे यशस्वीरित्या पार पडली.
    भारत निवडणूक आयोगाच्या 17 जून 2025 च्या पत्रानुसार आणि संबंधित SOP च्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया करण्यात आली. अर्जदार उमेदवारांनी तपासणीसाठी Diagnostic Checking हा पर्याय निवडला. त्यानुसार, संबंधित मतदान केंद्रावरील प्रत्यक्ष वापरलेली BU, CU व VVPAT यांची जोडणी करून Self Diagnostic Check घेण्यात आले. त्यानंतर VVPAT मधून 7 स्लिप्स प्रिंट झाल्या आणि एकूण मतदानाची माहिती उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली.
    Mock Poll च्या तुलनेत Diagnostic Checking या पर्यायात केवळ एकूण मतदानाची माहिती देण्यात येते, संपूर्ण निकाल नव्हे. ही तपासणी प्रक्रिया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) च्या अधिकृत अभियंत्यांद्वारे पूर्ण झाली.
    तपासणीसाठी उपस्थित राहिलेले अधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचा समावेश होता.
    तपासणीदरम्यान, 148-ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 68 च्या VVPAT मध्ये मतदान संपल्यानंतर बॅटरी न काढल्याचे निदर्शनास आले, मात्र BEL च्या अभियंत्यांनी उमेदवारांच्या सर्व शंका निरसन करून प्रक्रिया समाधानकारक रितीने पूर्ण केली असल्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी स्पष्ट केले.
    Diagnostic Tests यशस्वी ठरल्यामुळे संबंधित मशिन्स योग्य स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
error: Content is protected !!