शिराढोण (आकाश पवार ) – कळंब तालुक्यातील शिराढोण येथील अटल बिहारी वाजपेयी अंतरराष्ट्रीय आदर्श जिल्हा परीषद शाळेची गुणवत्ता सध्या उंचावताना दिसून येत आहे. शाळेत ज्ञानार्जण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विविध परीक्षेत चांगले निकाल येवू लागले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक गुणवत्तेसाठी प्रयत्न करत असून, त्यांना गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांची साथ मिळाली तर शिराढोण व परीसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थलांतरणास पुर्णविराम मिळाल्या शिवाय राहणार नाही.एके काळी अस्तीत्व अबाधित राखण्यासाठी धडपडणाऱ्या शिराढोण येथील जिल्हा परीषदेची शाळा आज मात्र विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी गजबजू लागली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा परिणामही दिसून येत आहे. शिराढोण व परीसरातील नागरिकांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी शिराढोण येथे सर्वे नं ३४५ मध्ये ५ एकर क्षेत्रावर जिल्हा परीषदेच्या वतीने सन १९५२ मध्ये प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणारी शाळा उभारण्यात आली. अतिशय खडतर प्रवास करुन ही शाळा शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण देत नावारुपाला आणली आहे. विविध शासकिय निधीतून शाळेची ईमारतही सुसज्ज झाली आहे.त्याच बरोबर शाळेत विविध पायाभूत सुवीधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळाल्याने यावर्षी त्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी विविध परीक्षेतून मिळवलेल्या यशातून दिसून येत आहे. गावाची शैक्षणिक दशा बदलून नविन दिशा देण्यासाठी गावातील नागरिकांनीही शाळेला थोडा वेळ देवून शिक्षकांच्या अडिअडचणी समजून घेवून त्यांचा उत्साह वाढवणे गरजेचे आहे. ‘शाळेला गावाचा व गावाला शाळेचा आधार’ या उक्ती प्रमाने काम झाले तर निश्चीत हे शिक्षणसंकूल गाव व परीसरात शैक्षणिक विकासासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
@ गावातील पालकांनी शाळेकडे लक्ष देण्याची गरज – शिराढोण येथील जिल्हा परीषद प्रशालेची गुणवत्ता तर वाढत आहेच, परंतु पालकांनीही शाळेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या पाल्याला घरी आल्यानंतर विचारपुस करणे तसेच शाळेतील शिक्षकांच्या संपर्कात राहून आपल्या पाल्याविषयी चौकशी करणे याबाबत पालकांनी जागरुकता दाखवावी. जेनेकरुन शाळेच्या गुणवत्तेत आणखीन भर पडण्यास मदत होईल.
& ही आहे शाळेची आदर्श टिम
शिराढोण येथील आदर्श जिल्हा परीषद शाळेत मुख्याध्यापक अर्जुन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक कांतीलाल गणगे, संघशिल रोडे, मुक्ता ढासाळकर, सुनीता पोतदार, बाळासाहेब काळे, विजय कांबळे, सचिन शिंदे, रमेशकुमार काकडे, शितल जाधव, रमेश व्होके, सुरवसे, रेडेकर, भाग्यश्री सविता, मिनाक्षी दहिवडे, मंजूषा बामने, अशोक गोसावी, संजय मरदोडे, दत्तात्रय राठोड, मकरंद नाडे, सुनील अहिरे, शिवलाल इनामदार या सोबतच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शैलेंद्र यादव व सर्व सदस्य शाळेच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयत्न करत आहेत.
&विविध परीक्षेत विद्यार्थ्यांनी यावर्षी मिळवलेले यश शाळेतील शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे यावर्षी शाळेतील चैत्राली बाळकृष्ण जाधवर ही विद्यार्थीनी नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र झाली. तसेच एनएमएमएस परीक्षेत प्रगती रविंद्र नाईकवाडे, शिवम सचिन पवार, अक्षय सुदाम खडबडे, हर्षदा दिगंबर पांचाळ, मोहिनी दयानंद राऊत हे विद्यार्थी प्रत्येकी ६० हजार रुपये शिष्यवृत्तीस पात्र झाले. सारथी शिष्यवृत्ती साठी प्रतिक अमोल सोमासे, श्रावणी सचिन माकोडे, श्रावणी शिवराज पौळ पात्र झाले आहे. त्यासोबच मंथन परीक्षेत साद तांबोळी, वरेन्यम यादव, श्रावणी सुर्यवंशी, आरोही खडबडे, श्रावणी माकोडे, प्राची खडबडे, रणवीर पाटील, चैत्राली जाधवर, वीर खडबडे, भाग्यश्री गायकवाड व अक्षरा कोंडेकर यांनी यश मिळवले आहे. जि.प.प्रशाला,शिराढोण शाळेचे NMMS परीक्षेत घवघवीत यश
शाळेतील पात्र 23 विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थी धारक व 3 विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र
NMMS धारक विद्यार्थी(प्रत्येकी 60000/- रू.शिष्यवृत्ती) प्रगती रविंद्र नाईकवाडे,शिवम सचिन पवार,हर्षदा दिगंबर पांचाळ,अक्षय सुदाम खडबडे,मोहिनी दयानंद राऊत
सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी(प्रत्येकी 38000/- रू.शिष्यवृत्ती) प्रतीक अमोल सोमासे,श्रावणी सचिन माकोडे,श्रावणी शिवराज पौळ या यशस्वी विदयार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
More Stories
‘दैनिक लोकमत’ समूहातर्फे शिराढोण येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न आला.
खर्च वाचला तर आत्महत्या थांबतील – सत्यपाल महाराज
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर