August 8, 2025

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

  • शिराढोण (परमेश्वर खडबडे) – येथील संघर्ष मित्र मंडळतर्फे गावातील उत्तर भीम नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे.
    यामध्ये जयंती मिरवणूक अध्यक्षपदी अमोल नाईकवाडे आणि उपाध्यक्षपदी निलेश नायकवाडे यांची निवड करण्यात आली आहे.
    समितीच्या बैठकीत यावर्षीची जयंती मोठ्या उत्साहात, वाजत-गाजत आणि भव्य सुशोभीकरणासह साजरी करण्याचा निर्धार करण्यात आला.संघर्ष मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
error: Content is protected !!