शिराढोण – ‘दैनिक लोकमत’ समूहाच्या वतीने आयोजित हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिनांक १७ जुलै २०२५ रोजी पी.एम.श्री.आदर्श जिल्हा परिषद शाळा,शिराढोण येथे उत्साहात पार पडला. ‘लोकमत’ वृत्तपत्राच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.यामध्ये उत्तम प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेला देखील उत्तम सहभागाबद्दल विशेष सन्मान देण्यात आला. या कार्यक्रमास शिराढोण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर,उपसरपंच अमोल माकोडे,वरुण पाटील,ॲड. नितीन पाटील,किरण सहाणे, राजूभाई डांगे,अशोक महाजन, परमेश्वर खडबडे,लोकमतचे विकास, मंगेश,वितरक बालू काका पाटील, मु.अ.आहिरे, उपक्रमशील शिक्षक रोडे यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे व सहभागाचे कौतुक करत ‘लोकमत’च्या सामाजिक उपक्रमांची स्तुती केली. याशिवाय वृत्तपत्र वाचनाच्या महत्त्वावरही भर देण्यात
More Stories
खर्च वाचला तर आत्महत्या थांबतील – सत्यपाल महाराज
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर
संविधान विटंबना,सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ शिराढोण येथे कडकडीत बंद