कळंब (माधवसिंग राजपूत ) – महावीर जयंती निमित्त जैन मंदिर मध्ये भगवान महावीर चा अभिषेक,पाळणा सोहळा संपन्न झाला. महावीर जयंती मिरवणुक जैन मंदिर,विठ्ठल मंदिर,बॅंक रोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, स्वातंत्र्य विनायक सावरकर चौकातून देवी रोड येथून जैन मंदिर येथे संपन्न झाली.यावेळी सामाजिक संदेशाचे दर्शन झाले. जगाला ‘जिओ और जिने दो’चा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांची जयंती कळंब येथे रविवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या मिरवणुकीतून जैनबांधवांनी सामाजिक एकोपा,अहिंसा, पर्यावरण संवर्धन,पाणी वाचवा, बेटी बचाव,शाकाहार याबाबत जनजागृती केली. सकल जैन समाजातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून कळंब येथे महावीर जयंतीचा उत्सव एकत्रितपणे साजरा केला जातो. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील,मेघ राणाजगजितसिंह पाटील,तालुका अध्यक्ष अजित पिंगळे, तालुका अध्यक्ष शिवाजी कापसे आदींची मिरवणुकीत उपस्थिती होती. चौका चौकात पिण्याचे पाणी, सरबत व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीनंतर सकल जैन समाजासाठी कंगळे परिवार कडून महाप्रसाद ठेवण्यात आला होता. उत्सवासाठी समितीचे हर्षद अंबुरे,संजय देवडा,बाबुशेठ लोढा,संतोष एखंडे,अनिल नाकील,अमोल बाभळे, लक्ष्मीकांत रामढवे,श्रीअंश पांगळ, प्रदीप संगवे, मिथुन साखरे,नितीन साखरे,दर्शन एखंडे,शुभम सांगवे,रमेश साखरे, प्रकाश मांडवकर, दीपक मांडवकर,राजाभाऊ मांडवकर, अनिल लोढा,अनिल लोढा,सुमित बलदोटा,यश सुराणा,अमोल लोढा,रोहन पारख,सुनील नाकील आदींसह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले