शिराढोण – आजकाल लग्नाचे समारंभ फार खर्चिक झाले.खर्च वाचविण्यासाठी चळवळ पुढी आली पाहिजे तसें झाले तर शेतकरी आत्महत्या थांबतील, मुलीच्या आई वडिलांवार संकट येणार नाही मी,आता मुलीच्या आत्महत्या सुरूच आहेत. हुंडाबळी तर मोठ्या प्रमाणात होतात म्हणून पैशाकडे नं पाहता गुणाकडे पाहावे.लग्नात फटाके फोडणे आदी पैशाची उधळपट्टी टाळली पाहिजे.लग्नाची वेळ राहते आठ वाजून बत्तीस मिनिट अन नाच नाच वाजवते बारा. लागुद्या लग्न आता असे विचार समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज सप्त खंजेरी वादक यांनी मांडले. कळंब तालुक्यातील शिराढोण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती,महात्मा फुले जयंती,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व सर्वज्ञ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती निमित्त समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. या वेळी अध्यक्ष सरपंच लक्ष्मी ताई म्हेत्रे,प्रमुख पाहुणे डॉ.शैलेंद्र चव्हाण अदिष्ठाता धाराशिव मेडिकल कॉलेज,रेणुका डुंबरे विश्व संकल्प प्रतिष्ठान ओतूर पुणे,वैशालीताई लोंढे यादव,शिवलीला कानडे,स्वेताताई लोंढे नगर सेवक लातूर, माजी जि.प सदस्य शहाजी पाटील हे होते. प्रबोधन करताना समाजात तेढ निर्माण होईल असे कोणी वागले नाही पाहिजे.सर्व धर्म समभावची भावना प्रत्येक व्यक्ती मध्ये राहिली पाहिजे.शेतकरी व शेतमजूर यांनी सामुदायिक विवाह जुळवावे,गावातील सर्व विवाह एकाच दिवशी एकाच मंडपात करावे,विवाह नोंदणी पद्धतीने करावा,घातक रूढी आणि अवस्थावं खर्च टाळावा, तिथी पंचांग पाहण्या पेक्षा पोरापोरीचे सद्गुण पाहावे.वृक्ष लावा मोक्ष मिळावा आदी विषयावर प्रबोधन केले.आणि सप्त खंजेरीचे वादकांचे वादन करून दाखवले.प्रबोधन करताना श्रोत्यातुन काही लोकांना प्रश्न विचारून समाज प्रबोधन करीत त्यांचा सत्कार करण्यात आला व काही महिलांना साड्याची भेट ही देण्यात आली. या वेळी किरण पाटील,निलेश नाईकवाडे,सतीश शिंपले, चंद्रकांत महाजन,नासेर पठाण, वरून पाटील,अमोल नाईकवाडे, विक्रम नाईकवाडे,अनिल गायसमुद्रे,ताजखा पठाण,ग्रामपंचायत सदस्य ज्योती महाजन,बेबी नंदा गोरे,अंजली गायकवाड,ज्योती नाईकवाडे,कोमल नाईकवाडे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन चंद्रकांत महाजन व निलेश नाईकवाडे यांनी केले. यांचा झाला सन्मान – १) नवोदय साठी सहा पात्र विद्यार्थी – प्राची कैलास खडबडे,सानवी महादेव समुद्रे,श्रावणी दयानंद राऊत,पंकजा पंढरी जाधवर,अभिषेक चंद्रशेखर कुलकर्णी,तेजस्विनी किरण राऊत.शिक्षक रमेश व्होके,रमेशकुमार काकडे २) या गावाकऱ्यांचा झाला सन्मान – बिभीषण पवार,विठ्ठल खडबडे,रवी नाईकवाडे,पांडुरंग कोळी,मंजूर दखनी,प्रतीक संगवे,खंडू वाघमारे,अभिजित पाटील,असिफ खैरात शेख,चक्रधर यादव,ज्योती महाजन,उषा दुगाने,दत्ता पवार,स्नेहल साळुंके
More Stories
‘दैनिक लोकमत’ समूहातर्फे शिराढोण येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न आला.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर
संविधान विटंबना,सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ शिराढोण येथे कडकडीत बंद