August 8, 2025

ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

  • कळंब- हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए- मिलाद सण कळंब शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो.यानिमित्त नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशन कळंब च्यावतीने 26 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी महाराज संकुल छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिर उद्घाटन प्रसंगी तारेख मिर्झा , मुस्ताकभाई कुरेशी, इस्माईल हन्नुरे , महादेव महाराज अडसूळ ,डॉ.रामकृष्ण लोंढे ,प्रदीप मेटे, अतुल गायकवाड, बालाजी गायकवाड यांची उपस्थिती होती. शिबिरात 68 रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले, रक्त सह्याद्री ब्लड बँक उस्मानाबाद टीमने संकलित केले या टीम मध्ये आकाश दापके देशमुख,वैशाली साहू, हर्षला घोंगडे ,अनिकेत कुंभार, महेश तोडकरी ,अशोक गायकवाड यांचा समावेश होता हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशन कळंब,आझाद ग्रुप, एस एस फाउंडेशन ,दयावान प्रतिष्ठान , लॉयन्स कंपनी संभाजी ब्रिगेड, लिजेड ग्रुप, गरीब नवाज कमिटी, बी .के स्टोन क्रेशर ,कुरेशी जमात एस .के कन्स्ट्रक्शन, बागवान ग्रुप यांनी सहकार्य केले शिबिर यशस्वी करण्यासाठी जावेद सौदागर, इमरान मिर्झा ,इमरान खान, अतुल माने ,अजित घुले ,लियाकात बागवान ,तय्यब सय्यद, अमन मोमीन वाजेद तांबोळी , अरेफ शेख , आदिल सय्यद ,सुशील वाघमारे, वसीम बागवान, कुंदन टोपे यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!