कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.५ फेब्रुवारी २०२५ रोजी विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संस्थापक अध्यक्षांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा जपत विद्यार्थ्यांमध्ये संस्कार,मूल्ये व शिक्षणाची प्रेरणा निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी