August 8, 2025

वेद संकुलात शहीद भगतसिंग जयंती उत्साहात साजरी

  • कळंब – शहरातील छत्रपती संभाजी महाराज नगर येथील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.२८ सप्टेंबर २०२३ रोजी शहीद भगतसिंग यांची ११६ वी जयंती साजरी करण्यात आली.
    या कार्यक्रमाचे अध्यक्ष भैरवनाथ औद्योगिक संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे हे होते तर प्रमुख व्याख्याते भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्रा.श्रीकांत पवार यांनी शहीद भगतसिंग यांनी भारत देश इंग्रज राजवटीतून स्वतंत्र होण्यासाठी केलेले कार्य विषद केले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके यांनी केले.
    याप्रसंगी प्रा.मोहिनी शिंदे, निदेशक अविनाश म्हेत्रे, निदेशक विनोद जाधव,निदेशक सागर पालके,निदेशिका कोमल मगर,लिपिक आदित्य गायकवाड,विनोद कसबे व सर्व विद्यार्थी-विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!