कळंब (माधवसिंग राजपूत) – गेली दहा दिवस श्री गणेश उत्सव मोठ्या थाटात उत्साहात साजरा होत आहे. सर्वत्र श्री गणेशाची भक्ती आराधना व पूजा केली जात आहे. श्री गणेशाच्या विविध रूपातल्या व आकाराच्या मूर्ती स्थापना गणेश मंडळांनी स्थापन केल्या आहेत. श्री गणेश सुखकर्ता व दुःखहर्ता आहे. तो भक्ताच्या मदतीला धावून येतो. यामुळे गणेश भक्त विविध स्वरूपातल्या आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा करतात.कळंब येथील अजीम शेखु भाई यांचे गांधीनगर येथे किराणा दुकान आहे. या दुकानात विक्रीसाठी नारळ ठेवले जातात विक्रीसाठी असलेल्या नारळात त्यांना एक मोठा नारळ आढळला कुतूहल म्हणून त्यांनी तो नारळ सोलला असता त्यांना त्या नारळात प्रत्यक्ष श्री गणेशाचे स्वरूप असलेले दिसले .यानंतर उपस्थित लोकांनी गणेश प्रगटलेत असे सांगितले. यानंतर गणेश स्वरूप नारळ त्यांनी त्यांच्या हिंदू मित्र शितल भडंगे यांच्याकडे सुपूर्द केले असल्याचे सांगितले.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश