February 6, 2026

विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६,गुरुवार रोजी विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा (ता. भूम,जि.धाराशिव) येथे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले.
    या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    यावेळी सहाय्यक शिक्षक नामदेव अनंत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. संस्थापक अध्यक्षांच्या शैक्षणिक कार्याचा आदर्श जपत विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षणाची प्रेरणा निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
error: Content is protected !!