March 26, 2026

ग्रामोदय समितीच्या संचालकपदी उद्योजक गुंडू पवार यांची एकमताने निवड

  • कुर्डूवाडी – कुर्डूवाडी येथील ग्रामोदय समिती संचलित आंतरभारती विद्यालय व आंतरभारती भाग शाळा,कुर्डू संस्थेच्या संचालकपदी उद्योजक गुंडू पवार यांची एकमताने निवड करण्यात आली.थोर समाजवादी विचारवंत व संस्थेचे अध्यक्ष स्व. साथी पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या संचालक पदावर ही निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया संस्थेचे उपाध्यक्ष सुनील शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
    उद्योजक गुंडू पवार यांना सामाजिक,शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रसेवा संचलित आपल्या घर संस्थेचे सचिव म्हणून काम पाहिले असून,उस्मानाबादी गोट फार्मिंग अँड ट्रेनिंग सेंटर, धाराशिवचे अध्यक्ष,शेती व ग्रामीण विकास संशोधन मंडळ,परांडा तालुका संचालक,डॉ.वीनाताई सुराणा सामाजिक सेवाभावी संस्था,धाराशिवचे अध्यक्ष,राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसेच ज्ञानदीप कलोपासक मंडळ, आलियाबाद संचलित धरित्री माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाचे संचालक म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
    कृषी क्षेत्रातही ते आदर्श बागायतदार म्हणून परिचित असून,शेती व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात त्यांचा भरीव अनुभव आहे. त्यांच्या निवडीमुळे ग्रामोदय समितीच्या कार्याला नवी दिशा मिळेल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
    यावेळी संस्थेचे अध्यक्ष फुलचंद धोका,उपाध्यक्ष सुनील शहा, सचिव प्रकाश शहा,कोषाध्यक्ष जगन्नाथ बापू क्षीरसागर,संचालक मंडळातील पूनम शहा,धनंजय डिकोळे,राहुल शेंडे,राजसिंह लिंबाळकर,अलका सिंदकर, अमित साळुंखे,संजय डिकोळे आदी उपस्थित होते.तसेच आंतरभारती विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खुणे, आंतरभारती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लावणय सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
    सर्व उपस्थितांनी नूतन अध्यक्ष फुलचंद धोका,नूतन संचालक उद्योजक गुंडू पवार व अलका सिंदकर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!