August 9, 2025

संभाजी विद्यालयात बालिका दिन उत्साहात साजरा

  • वाशी- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींची स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने पिंपळगाव लिंगी येथील संभाजी विद्यालयात मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी कतृत्वाचा प्रेरणास्त्रोत,पेटती मशाल,शोषितांची ढाल क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
    यावेळी स्त्री- शिक्षणाची उद्धारी, विद्येची खरी देवता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
    याप्रसंगी मुख्याध्यापक सावंत म्हणाले की,भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका आणि सामाजिक परिवर्तानाच्या लढाईतील वीरांगणा सावित्रीबाई फुले यांची जयंती आज साजरी होत आहे. आज
    विविधांगी क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या समस्त स्त्रियांच्या कर्तृत्वाचा पाया स्त्री शिक्षणाच्या कार्यातून ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी रचला.सुधारणा कार्यात जोतिबा फुले यांना समर्थ कृतीशील साथ देणाऱ्या सावित्रीबाई फुले म्हणजे अष्टपैलु व्यक्तित्व, व्यासंग आणि काळाच्या पुढे बघण्याचे द्रष्टेपण होय. या सदगुणांच्या माध्यमातून महात्मा जोतिबा यांच्या सोबत सावित्रीबाईंनी टाकलेले प्रत्येक पाऊल येणाऱ्या अनेक पिढ्यांना दिशा देणारे आहे. प्रचंड प्रतिकुलतेत ही स्वहिमतीवर योग्य सुधारणावादी भूमिका घेण्याची
    वैचारिक क्षमता त्यांच्याकडे होती. त्यासोबतच विरोधाला न जुमानता घेतलेल्या सुधारणावादी भूमिकेवर प्रवाहाच्या विरोधात जाऊन ठाम राहण्याचा निश्चयीपणा सावित्रीबाईंच्या तेजस्वी कारकिर्दीचे ठळक वैशिष्ट आहे. कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मनोगते व्यक्त केली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जोंधळे यांनी तर समारोप सुनिल बावकर यांनी केला.
    या प्रसंगी प्रशालेचे सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक संतोष ढोले, संतोष बोडके,सुहास जगताप, शिक्षकेत्तर दै.जनमत पत्रकार
    शिवराम शिंदे,दतात्रय जेवे आदी उपस्थीत होते.
error: Content is protected !!