मोहा (राजेंद्र बारगुले ) – क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलींनी अभ्यास करून विविध क्षेत्रांमध्ये काम केले पाहिजे व देशाची उन्नती केली पाहिजे.असे प्रतिपादन पर्यवेक्षक कमलाकर शेवाळे यांनी केले. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार विद्यालय मोहा ता.कळंब येथे प्राथमिक शाळेमध्ये दि.३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील हे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे पर्यवेक्षक शेवाळे कमलाकर हे उपस्थित होते.यावेळी सहशिक्षिका श्रीम.नीता सोनवणे यांनी आपले विचार मांडले.तसेच कु.आदिती मडके,सिमरन पठाण ,आल्फिया पठाण,स्नेहा कानडे ,समीक्षा बागल,अंकिता मडके ,श्रावणी माने ‘आदीं विद्यार्थिनींनी आपले विचार मांडले.तसेच यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु . सानिका बाराखोते हिने केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.अनुष्का मडके हिने केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे जेष्ठ सहशिक्षक शहाजी सोलंकर , श्रीमती पांचाळ उषा , श्रीमती सोनवणे निता ,जाधव मामा आदींनी यावेळी परिश्रम घेतले.
More Stories
चि.सिद्धार्थ सुतार एमटीएस ऑलिंपियाड परीक्षेत राज्यात पाचवा
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार