August 8, 2025

मिनी ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांनी ऑनलाईन अर्ज करावेत

  • बीड – बीड जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनावर जिल्हा प्रमुख बीड जिल्हा मुख्य हे राजकारणात सक्रिय असून स्वतःच्या गावातील ग्राम पंचायत चे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.शासकीय नियम धाब्यावर शासनाची फसवणूक करत असल्याची फार मोठी दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
    शिवाय महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना वर मेडिकल ऑफिसर बीड जिल्हा येथे शासकीय योजनेत पगारी काम करत असून ते एका प्रायव्हेट मेडिकल शिक्षण संस्थेत होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय येथे मेडिकल ऑफिसर तथा लेक्चरर म्हणून दोन्ही ठिकाणी काम करत आहेत हि शासनाची फसवणूक असून सदर प्रकरणाची बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्वतः लक्ष देऊन दोषीवर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्याचे, ज्ञानमाता माहिती अधिकार कार्यकर्ते नागरिक समूह तथा प्रशिक्षण केंद्राचे सदस्य, युवा नेते अक्षय गोटेगावकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते दत्ताभाऊ शेंडगे यांनी केली आहे.
    भरती प्रक्रियेच्या नियमावलीचा नियमभंग करून बोगस भरती केलेल्या आरोग्य सेवकांमुळे गरजू पात्र व लायक उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा अंदाज गोटेगावकर यांनी व्यक्त केला आहे. पुन्हा एकदा भरती प्रक्रिया नव्याने राबवून गरजू, पात्र व लायक उमेदवार यांची निवड प्रक्रियेतून निवड करावी.
    महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना बीड जिल्हाप्रमुख यांनी बीड जिल्ह्यात आरोग्य मित्राची केलेली भरती नियमभाह्य असुन अपात्र, सर्व एकाच गावातील जास्तीत जास्त उमेदवारांची केलेली आहे त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात आली आहे . सदर बाबी अतिशय गांभीर्य असून गंभीर असून यातील योजनेतील सदस्य, प्रमुख सर्व दोषी यांची खातेनिहाय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत शिवाय त्यांनी भ्रष्टाचारांमधून गोळा केलेली संपत्ती शासन तिजोरीत पुनर्प्राप्ती व्हावी व सदर पदाच्या ठिकाणी योग्य लायक प्रामाणिक, प्रामाणिक व लायक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी शिवाय त्यांनी केलेल्या सर्व आरोग्य सेवकांची नियमावलीप्रमाणे पात्रता तपासून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी तक्रार निवेदनात दत्त शेंडगे यांनी मागणी केली आहे.
    दोषींवर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शनांसह बीड जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येईल असेही गोटेगावकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
error: Content is protected !!