August 8, 2025

कळंब येथे प्रहार च्या वतीने रस्ता रोको आंदोलन

  • कळंब (महेश फाटक ) – दिनांक 13/12/2023 रोजी
    छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब जिल्हा धाराशिव येथे दुधाला हमीभाव मिळावा तसेच गाईचे दूध 50 रुपये प्रति लिटर खरेदी करावे व म्हशीचे दूध 70 रुपये प्रति लिटर दराने खरेदी करावे यासाठी प्रहार शेतकरी संघटना कळंब शाखेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
    सदरील आंदोलन संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चु भाऊ कडू यांच्या आदेशाने तसेच प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाप्रमुख वर्षद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, यावेळी जिल्हाप्रमुख वर्षद शिंदे यांनी शासनाने दुधाचे भाव टप्प्याटप्पाने कशाप्रकारे कमी केले. आणि यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण पणे कंबरडे मोडले असून सरकारच्या चुकीच्या धोरणाचा खरपूस समाचार घेतला तसेच प्रहार युवक जिल्हाप्रमुख मनोज जाधव यांनी यावेळी बोलताना राज्य सरकार व केंद्र सरकार DNA हा शेतकऱ्यांचा नसून तो व्यापारांचा आहे. अशी टीका केली यावेळी बोलताना कळंब प्रहार शेतकरी संघटना तालुका प्रमुख धनाजी पाटील यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत असून हे पाप सरकारचे असून येणाऱ्या काळात आमच्या मागण्यांचा योग्य विचार नाही झाला तर कोणत्याही मंत्र्याला रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही. हे निवेदन स्वीकारण्यासाठी नायब तहसीलदार अधिकारी उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या तीव्र अशा स्वरूपाच्या भावना प्रशासनाच्या वतीने शासनापर्यंत तात्काळ पोहोच करू असे सांगितले या कार्यक्रमास दिनेश गुडे जिल्हा उपअध्यक्ष,प्रहार महिला आघाडीच्या उपजिल्हाध्यक्ष राजकन्या जावळे मॅडम, युवक तालुकाध्यक्ष निखिल गंभीरे ,प्रहार सोशल मीडिया तालुकाध्यक्ष नमस्ते धाराशिव चे राजकुमार अडसूळ , विकास गंभीरे, विजयसिंह पाटिल, नॅचरल डेअरीचे बळीराजा गंभीरे, ऋषिकेश आडसूळ समाधान आडसूळ ऋषिकेश जाधव,कर्ण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक भैया गुजर राहुल अडसूळ या पदाधिकाऱ्यांसह शेकडोंच्या संख्येने रस्ता रोको आंदोलनात शेतकरी होते.
error: Content is protected !!