बीड – महाराष्ट्रातील लाखो लाभार्थी भगिनींसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेची ई-KYC करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबरवरून वाढवून ३१ डिसेंबर २०२५ अशी करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार, तसेच महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राज्यभर यशस्वीपणे राबवली जात आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक अडचणी व वेळेअभावी अनेक भगिनी ई-KYC करू शकल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर महाएनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे बीड जिल्हा समन्वयक तथा लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांनी ई-KYC मुदतवाढीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारने तातडीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
सरकारने जाहीर केलेल्या नियमानुसार— ज्यांच्या वडिलांचा किंवा पतीचा मृत्यू झाला आहे, घटस्फोटित महिला, त्यांनी स्वतःची ई-KYC करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र/घटस्फोट प्रमाणपत्र/न्यायालयीन आदेश यांची सत्यप्रत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे योजनेंतर्गत लाभ सातत्याने आणि निर्विघ्नपणे मिळणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.अद्याप ई-KYC न केलेल्या लाभार्थींनी नवीन अंतिम मुदतीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी आवाहन केले.
More Stories
संघर्षातून उभा राहिलेला जननायक : बाजीराव दादा चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल
“शाश्वत विकासाचा आदर्श नमुना! बोरफडी ग्रामपंचायतीच्या उपक्रमांची उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून प्रशंसा”
ॲड.वर्षाताई देशपांडे यांना “युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड २०२५”; न्युयॉर्कमध्ये जागतिक सन्मान