मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील तीन प्रयोगांची निवड जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. दि.१३ डिसेंबर २०२३ रोजी मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रदर्शन माध्यमिक व प्राथमिक अशा दोन गटात घेण्यात आले होते. माध्यमिक विभागातून ३२ शाळेने सहभाग नोंदवला. यामधून विद्यालयातील समीक्षा मडके हीने सादर केलेला “स्मार्ट व्हिलेज” या प्रयोगास तृतीय क्रमांक मिळाला. त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये प्रार्थमिक विभागातून ६६ शाळेने सहभाग नोंदवला होता. यामधून विद्यालयातील अनुष्का रमेश मडके हिने सादर केलेला “शाश्वत शेती” या प्रयोगास द्वितीय क्रमांक मिळाला. त्याचबरोबर शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्यामध्ये श्रीमती निता सोनवणे यांच्या शैक्षणिक साहित्यास प्रथम क्रमांक मिळाला. अशा एकूण तीन प्रयोगांची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचा सत्कार संस्थेचे जेष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक संभाजी गिड्डे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शेखर गिरी यांनी मानले.विद्यार्थ्यांना श्रीमती निता सोनवणे, सतीश मडके शैलेश गुरव, विठ्ठल जाधव, अमित जाधव, श्रीमती सावंत यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर,अध्यक्ष अनिल मोहेकर,संस्थेचे जेष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर, शाळेचे मुख्याध्यापक संजय जगताप, पर्यवेक्षक संभाजी गिड्डे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले