बीड – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बीड तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मौजे बोरफडी गावाला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांनी शुक्रवार,दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी ग्रामपंचायतीत राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. या मोहिमेत राज्यातील ३७,३९७ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर पाच कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर आहे. त्या पार्श्वभूमीवर बोरफडी ग्रामपंचायतीने सर्व इंडिकेटर पूर्ण करण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न सुरू केले आहेत. गावात प्लास्टिकबंदी, बचत गट बळकटीकरण,घरकुल योजना, आयुष्यमान भारत कार्ड वाटप, अॅनिमिया मुक्त गाव मोहीम, ग्रामपंचायती हद्दीत सीसीटीव्ही बसविणे यांसारखे महत्वाचे उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. या पाहणीवेळी बीड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण मोरे, अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक अशोक खरसाडे, तसेच स्थानिक पातळीवरील सरपंच कैलास घुगे, युवा उद्योजक सुनील कुटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावाच्या शाश्वत विकासासाठी अधिक गतीने कार्य करण्याच्या सूचना श्री.काळे यांनी यावेळी दिल्या.
More Stories
संघर्षातून उभा राहिलेला जननायक : बाजीराव दादा चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ : बाजीराव ढाकणे यांचा पाठपुरावा यशस्वी
ॲड.वर्षाताई देशपांडे यांना “युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड २०२५”; न्युयॉर्कमध्ये जागतिक सन्मान