August 8, 2025

विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
    आपल्या शाहिरी व लेखणीद्वारे वंचित, शोषित जनतेच्या व्यथा संपूर्ण देशातच नव्हे तर जगभर पोहोचवणाऱ्या डॉ.साठे यांचे योगदान विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आले.
    कार्यक्रमात डॉ.प्रकाश निवृत्ती वाघमारे अध्यक्षस्थानी होते,तर ज्ञानेश्वर गिलबिले (जि.प.अध्यक्ष, शालेय समिती,केंद्रीय शाळा आष्टा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी सिद्धनाथ ग्रुपचे अध्यक्ष अभिजीत काकडे व लहुजी सेनेचे अध्यक्ष निखिल बल्लाळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वही व खाऊचे वाटप करण्यात आले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक शशिकांत मांजरे यांनी केले.यावेळी धनंजय घोलप, अजय दाखले,अमित वाघमारे, रोहन घोलप,प्रशांत गिलबिले, कुबेर नलवडे,करण वाघमारे तसेच आष्टा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    नामदेव आनंत्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्रीमती निर्मला वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या कार्यक्रमाद्वारे महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची उजळणी करत विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
error: Content is protected !!