February 8, 2026

विद्यामंदिर हायस्कूल आष्टात कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्मृतीस अभिवादन

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा येथील कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा (ता.भूम जि.धाराशिव) येथे संस्थापक अध्यक्ष कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन व अभिवादन करण्यात आले.
    यावेळी गणित विषयाचे शिक्षक शशिकांत मांजरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
error: Content is protected !!