August 8, 2025

शिवसेना कळंब तालुक्याच्या वतीने पांडुरंग कुंभार यांचा सत्कार

  • कळंब – माजी नगराध्यक्ष आणि अनुभवी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग (तात्या) कुंभार यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना (उबाठा) कळंब तालुक्याच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
    ही निवड म्हणजे कळंब तालुक्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रासाठी एक गौरवाची बाब असून,तात्यांचा अनुभव, प्रामाणिक कार्यपद्धती आणि सर्वसमावेशक विचारसरणी यांचा महाविकास आघाडीला निश्चितच फायदा होणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
    या सत्कार प्रसंगी शिवसेना कळंब तालुकाप्रमुख सचिन काळे, उपजिल्हाप्रमुख प्रदीप मेटे,विश्वजीत जाधव,श्याम खबाले,हनुमान पाटील,अफसर पठाण,गोविंद चौधरी,संतोष लांडगे,सुलेमान मिर्झा,पुरुषोत्तम चाळक,रामदास गायकवाड,बाबा पवार,खंडू लांडगे,किरण खोसे, अशोक साळुंके,हर्षवर्धन पाटील,जुनेद बागवान,असिफ बागवान श्याम पांचाळ आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    सत्कार प्रसंगी तात्यांनी भावनिक प्रतिसाद देत सांगितले की, “सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर लढा देण्यासाठी आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन विकासासाठी कार्यरत राहणार आहे.”
    कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी कुंभार यांना पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांच्याकडून महाविकास आघाडीच्या संघटन योगदानाची अपेक्षा व्यक्त केली.
error: Content is protected !!