आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा ता.भूम येथे दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी निवृत्त सैनिक माजी सुभेदार प्रमोद चंद्रसेन जाधव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक,पत्रकार,व्यापारी, गावचे सरपंच,पोलीस पाटील, ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमास माजी सैनिक दादासाहेब सतीराम जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सर्जेराव काकडे,अरुण उत्तमराव काकडे,बाबुराव राजाराम लोखंडे, सरपंच सुनील दिगंबर जाधव, ग्रामसेवक शं.नलवडे,तात्यासाहेब अष्टेकर,तानाजी गिलबीले,माजी सैनिक पत्नी सौ.कुसुमताई महादेव शेळके,ज्ञानेश्वर गिलबीले, डॉ.प्रकाश वाघमारे,माजी सरपंच रविंद्र वाघमारे,ह.भ.प.सतीश महाराज कदम,सौ.दीपांजली नितीन जाधव (सहशिक्षिका, पुणे), दत्तात्रय महादेव शेळके, सहशिक्षक नामदेव अनंत्रे, शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी लयबद्ध कवायत व लेझीम सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणासाठी ग्रामस्थांकडून ₹२,५००/- रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आली. प्रजासत्ताक दिनानिमित्त शासन आदेशानुसार असाक्षर गाव निर्मूलन शपथ तसेच कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची शपथ उपस्थितांकडून घेण्यात आली. कार्यक्रम देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
विद्यामंदिर हायस्कूल आष्टात कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्मृतीस अभिवादन
संस्थामाता कै.सुमन आई मोहेकर यांना विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे अभिवादन