कळंब – कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या चौकामध्ये साहित्याचे महामेरू,संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार,साहित्यरत्न, लोकशाहीर, डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी “लाल ध्वजाचे” ध्वजारोहण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र पाटुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गावचे सरपंच अमोल पाटील,उपसरपंच दयानंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील,सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील,अजित शेळके, मानव अधिकार आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत पाटुळे यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी सचिन शेळके,पत्रकार सुनील पाटील,गोपाळ शेळके, शिवाजी बोबडे,दिपक सावत,माणिक काकडे,भिमशाहीर राजेंद्र कांबळे,भारत मगर,सावता माळी, सतिश वैद्य,श्रीमंत पाटील, यांच्या हस्ते ही महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.या वेळी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जिवन चरित्रा विषयी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी बाळासाहेब पाटुळे,शाखा अध्यक्ष सचिन पाटुळे,महावीर पाटुळे,भिमराव कांबळे,श्रीनिवास पाटुळे,शामराव पाटुळे,भगवान पाटुळे,सुरेश पाटुळे,महादेव पाटुळे,अनिल पाटुळे,शाहु पाटुळे,धनंजय पाटुळे,संजय पाटुळे,श्रावण पाटुळे,आबाराव पाटुळे, बाबासाहेब पाटुळे,विकास पाटुळे, आकाश पाटुळे,आदेश पाटुळे,मिठु पाटुळे,राम पाटुळे,मारुती लोंढे,नाना चांदणे,भिकाजी चव्हाण,संतोष पाटुळे,शंकर राजगुरू, सुर्यकांत सौदागर,मोहन मगर,बलभिम निर्फळ, उत्तम सावंत,शंकर पाटुळे,धनंजय कांबळे,रामहारी मंडाळे, विकास कदम,दिपक ताटे यांच्या सह ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत भाऊ पाटुळे यांनी केले तर आभार बाळासाहेब पाटुळे यांनी मानले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले